सायकल चोरी प्रकरण: पोलिसांनी तत्परतेने पकडून दिली चोरीची सायकल


सायकल चोरी प्रकरण: पोलिसांनी तत्परतेने पकडून दिली चोरीची सायकल

स्थानिक प्रतिनिधी, एटापल्ली
तारीख: 2/10/2024

2 ऑक्टोबर 2024 रोजी शाळेच्या परिसरातून चोरीस गेलेल्या सायकलचा शोध अवघ्या 3 तासात लागला आहे. स्थानिक पोलीस दलाच्या तत्परतेमुळे आणि सखोल तपासाच्या आधारे चोरीला गेलेली सायकल मूळ मालकाकडे सुखरूप परत करण्यात आली.

एटापल्ली येथील संस्कार पब्लिक स्कूल परिसरातुन 10 वर्षीय मुलाची सायकल चोरीला गेली होती. संस्कार शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने सायकल चोरी केलेल्या इसमांची विडिओ फुटेज व फोटो सह शाळेने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी संशयित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. संशयिताने चोरीची कबुली दिली असून, सायकल जवळच्या एका दुकानात विकण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी सायकल हस्तगत करून ती मूळ मालकाकडे परत दिली आहे.

सायकल परत मिळाल्याबद्दल संस्कार पब्लिक स्कूल चे श्री विजय संस्कार व विद्यार्थ्याच्या कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत. "पोलीस दलाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी तत्परतेने कारवाई करून आमची सायकल परत दिली," असे मुलाच्या वडिलांनी सांगितले व शाळेने सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा घटनांमध्ये त्वरित तक्रार करण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. "सतर्कता आणि तत्पर कारवाईमुळे आम्ही चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवू शकतो," असे त्यांनी सांगितले. यावेळी अंमलदार प्रकाश गडकर, कॉन्स्टेबल देवानंद कुमरे यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments